Ad will apear here
Next
टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य
शेअर बाजारात सध्या ‘टीसीएस’च्या उत्तम कामगिरीमुळे संगणन कंपन्यांच्या शेअर्सला अनुकूल वातावरण आहे. पेट्रोलचे भाव चढे राहणार असल्याने पेट्रोलियम कंपन्याही तेजीत आहेत. त्यामुळे सध्या ‘टीसीएस’सह पेट्रोलियम कंपन्या आणि ‘मँगनीज ओअर इंडिया’चे शेअर्स खरेदीसाठी उत्तम आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ..
...
संगणक क्षेत्रातल्या ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने (टीसीएस) जून २०१८च्या तिमाहीत गेल्या पंधरा तिमाहींतली सर्वोकृष्ट कामगिरी नोंदविली आहे. या तिमाहीची तिची कमाई ५.०५ अब्ज डॉलर्स इतकी आहे. नक्त नफा १.०८ अब्ज डॉलर्स झाला आहे. आता तिच्या शेअर्सचे बाजारमूल्य १०० अब्ज डॉलर्सवर आहे. यापूर्वी पहिल्या स्थानावर असलेल्या ‘एचडीएफसी’ला तिने आता मागे टाकले आहे. या वेळची ४४ टक्के वाढ दाखवल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटले आहे. गेल्या वर्षाची वाढ ३० टक्के होती. २०१८-१९मध्येही कंपनी किमान ३० टक्के वाढ दाखवील, असे कंपनीचे राजेश गोपीनाथ यांनी म्हटले आहे. कंपनी सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणावर निर्यात करते व घसरत्या रुपयाचा तिला फायदाच होत आहे. कंपनीची आणखी वाढ व्हावी म्हणून दुसऱ्या कंपन्यांचे आग्रहण हाही एक पर्याय कंपनीने डोळ्यांसमोर ठेवला आहे. 

टाटा कन्सल्टन्सी शेअर सध्या एक हजार ९८० ते दोन हजार रुपयांच्या पातळीत आहे. वर्षभरातील किमान व कमाल भाव अनुक्रमे ११८८ रुपये व १९९८ रुपये होते. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर २९.५१ पट दिसते. रोज सुमारे अडीच कोटी शेअर्सची उलाढाल होते. यंदा कदाचित भाव १७०० रुपयांच्या खाली आला, तर दीर्घ मुदतीसाठी इथे जरूर गुंतवणूक करावी.

हेग व ग्राफाइट हे शेअर्स आता अनुक्रमे एक हजार रुपये व तीन हजार ९०० रुपयांवर आले आहेत. त्यांचे जून व सप्टेंबर तिमाहीचे आकडे आले, की ते अजून वधारतील. डिसेंबरपर्यंत ग्राफाइट इंडियाचा शेअर १२०० रुपये व्हावा आणि ‘हेग’ने ४६०० रुपयांची पातळी गाठावी. 

गुंतवणुकीसाठी ‘मँगनीज ओअर इंडिया’चाही विचार करता येईल. मार्च २०१८ला संपलेल्या वर्षासाठी या कंपनीची विक्री ९९० कोटी रुपये व नक्त नफा ४२२ कोटी रुपये होता. कंपनीने गेल्या वर्षात ८७.६६ लाख शेअर्सची पुनर्खरेदी केलेली होती. तसेच एकास एक बक्षीस भागही दिला होता. मँगनीजचे भाव कंपनी सतत वाढवत असल्यामुळे तिच्या नफ्यात येत्या दोन वर्षात ३० टक्के चक्रवाढ दराने वाढ होईल. २०३०पर्यंत कंपनी आपले उत्पादन ३० लक्ष टनांवर नेणार आहे. त्यामुळे सध्या १८४ रुपयांना मिळणारा हा शेअर वर्षभरात ४० टक्के नफा देऊन जाईल. आता पेट्रोलचे भाव वाढत राहणार असल्यामुळे ‘ओएनजीसी’ला त्याचा फायदा होईल. तसेच पेट्रोल शुद्धीकरण करणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमचे मार्जिन वाढेल. त्यामुळे हे तिन्ही शेअर्स अवश्य घ्यावेत.

- डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZSQBQ
Similar Posts
कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल सध्या कंपन्यांचे जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होत आहेत. त्याशिवाय रिझर्व्ह बँकेने वाढवलेला रेपो दर, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत राजकीय घडामोडी या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या कोणते शेअर्स घेण्यायोग्य आहेत, त्याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
शेअर बाजारात तेजी; ‘हे’ शेअर्स फायद्याचे! शेअर बाजारात सध्या तेजीचा झंझावात दिसत आहे, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सध्या गृहवित्त कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य आहेत. त्यासह अन्य काही शेअर्सबद्दल अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
शेअर बाजारात तेजीची चिन्हे राजकीय स्थैर्य खुंटा हलवून बळकट झाल्याने पुढील सहा महिने बाजारात अनेक शेअर्स वर्षभरातील उच्चांकी भाव गाठतील. गेल्या आठवड्यात अनेक कंपन्यांचे जून तिमाहीचे उत्तम आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात शेअर बाजारात तेजीचे वारे वाहतील. त्याचा लाभ घेण्यासाठी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याबाबत
गृहवित्त कंपन्या, खासगी बँका, पेट्रोलियम कंपन्याचे शेअर्स उत्तम पावसाची समाधानकारक वाटचाल, कच्च्या तेलाचे उतरते दर, रुपयाची बळकटी यामुळे सध्या गृहवित्त कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, खासगी बँका यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत. अशा काही निवडक शेअर्समधील गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language